नवी मुंबई पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांनी बेलपाडा गाव येथे आयोजित केलेल्या "स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१"पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यानी स्पर्धेचे उद्घाटन करून आयोजक आणि स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे आणि स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे संस्थापक श्री.मधुकर दरेकर, तालुका चिटणीस श्री.राजेश केणी, जि.प सदस्य श्री.रविंद्र पाटील, श्री.शिवछत्रपती क्रिडा जिवन गौरव पुरस्कार विजेते श्री.संतोष शिंदे, युवक संघटना जिल्हा अध्यक्ष श्री.देवा पाटील, मा.उपसरपंच श्री.सचिन घरत, उरण तालुका युवक संघटना अध्यक्ष श्री.रमाकांत म्हात्रे, गव्हाण ग्रा.पं सदस्य श्री.रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, सदस्या सौ.शिल्पा कडू, महिला बचत गट अध्यक्षा सौ.कलावती घरत, आयोजक श्री.किरण कडू, श्री.संतोष शिंदे, युवा नेता श्री.रमाकांत कडू, श्री.मदन घरत, श्री.सुशन घरत, श्री.प्रवीण कडू, श्री.निलेश पाटील तसेच सहकारी व स्पर्धक यावेळी उपस्थित होते.