कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विधायक कामांचा धडाका सुरूच.....!

  कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विधायक कामांचा धडाका सुरूच.....!


मुंबई शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.*

काल बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार मा श्री बाळाराम पाटील साहेब यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक श्री सांगवे सर यांची भेट घेतली. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडली.

 *कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डिसेंबर पर्यंत पालघर जिल्ह्यात स्वतंत्र वेतन पथक कार्यालय सुरू होणार*

पालघर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मा.श्री. बाळाराम पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर पालघर जिल्ह्यात स्वतंत्र वेतन पथक कार्यालय सुरू होणार आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र वेतन पथक कार्यालय श्री बाळाराम पाटील साहेब यांनी मंजूर करून घेतले होते. परंतु काही प्रक्रिया प्रलंबित असल्याने मान्यता मिळूनही पालघर जिल्ह्यात वेतन पथक कार्यालय सुरू झाले नव्हते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आजच्या बैठकीत श्री.बाळाराम पाटील साहेब यांनी शिक्षण उपसंचालकांशी याबाबत चर्चा करून पालघर जिल्ह्यात स्वतंत्र वेतन पथक कार्यालय सुरू करून आवश्यक स्टाफ  देण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच डिसेंबर पर्यंत पालघर जिल्ह्यात स्वतंत्र वेतन पथक कार्यालय तयार करण्यात येणार असून मुंबई उपसंचालक कार्यालयातून २ अधिकारी सदरहू वेतन पथक विभागासाठी मिळणार आहेत. पालघर जिल्ह्यातच वेतन पथक कार्यालय सुरू होणार असल्याने आता पालघर मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठाणे जिल्ह्यात येण्याची आवश्यकता राहणार नाही. श्री. बाळाराम पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे पालघर मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

 *शालार्थ आय डी बाबत.*

सदर भेटीत १०-१२ शिक्षकांचे शालार्थ आय डी तत्काळ तयार करून घेण्यात आले. तसेच २०% अनुदान मंजूर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत ३३२ शिक्षकांपैकी १०० शिक्षकांचे शालार्थ आय डी तयार करून घेण्यात आले आहेत. मा श्री बाळाराम पाटील यांनी  संचालक श्री. सुपे सर याना फोन करून सदरहू १०० शिक्षकांचे शालार्थ आय डी तयार करून घेतले आहे. उर्वरित २३२ शिक्षकांचे शालार्थ आय डी पुढील दोन - तीन दिवसात तयार करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी मा सुपे सर यांनी दिले. या प्रकरणाबाबत श्री बाळाराम पाटील साहेब विशेष लक्ष घालत असून लवकरच उर्वरित  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना देखील शालार्थ आय डी मिळावेत यासाठी श्री बाळाराम पाटील यांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

 *दिवाळीपूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व्हावे*

दिवाळीपूर्वीच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळण्यासाठी योग्य ती आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मुंबई उपसंचालकांना श्री बाळाराम पाटील साहेब यांनी दिल्या आहेत. वेतन दिवाळीपूर्वी व्हावे यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुंबई उपसंचालक श्री. सांगवें सर यांनी यावेळी दिले.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे आणि ऑक्टोबर वेतनासोबत  महागाई भत्त्याची थकबाकी एन पी एस धारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळावी यासाठी श्री. बाळाराम पाटील साहेब लवकरच वित्त मंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेणार आहेत.

बैठकीत कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या समवेत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना राज्याध्यक्ष श्री भानुदास तुरुकमाने सर आणि पालघर वेतन अधिकारी श्री. नरेश पाटील सर उपस्थित होते.