बातमी दिनांक २२/१०/२०२१ प्रश्न जनतेचे,काम शेकापचे
लाल सलाम,संघर्ष आणि आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम आतापर्यंत शेकापच्या प्रत्येक पिढीतील नेतृत्वाने केले आहे.कधी आघाडी करून तर कधी युती करून जनसामान्यांना त्रासदायक ठरणा-या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शेकापने आंदोलनाच्या माध्यमातून नागरीकांना दिलेले आहे.हातात सत्ता असू दे अथवा नसू दे सदैव जनतेच्या पाठीशी राहून शेकापने वेळोवेळी आपले सामाजिक दायित्व जपले आहे.प्रत्येक जीवाला जगण्यासाठी पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आहे.सिडकोने वसवलेल्या कामोठे नगरवासीयांना त्यांच्या हक्काचे पाणी सुद्धा मिळणे आता मुश्कील झाले आहे.पनवेल महानगरपालिकेचा अविभाज्य अंग असलेल्या कामोठे उपनगरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे.कामोठेकरांना या समस्येतून मुक्तता मिळावी यांसाठी आदरणीय आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापचा लाल बावटा तसेच मविआ पदाधिकारी यांनी सिडको प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करून सिडकोच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले.प्रस्तुत व्हीडीओमध्ये आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आक्रमक बाणा अधिकारी वर्गाची बोलती बंद करणारा ठरला.संबंधित आंदोलनाच्या माध्यमातून विरोधकांना एवढेच सांगायचे आहे संघर्ष आणि आंदोलन यांचा शेकापशी असणारा रूणानुबंध कधीच तुटणारा नाही .लवकरच या लढ्याला यश मिळून कामोठेकरांचा पाणीप्रश्न सुटेल ,जिथे असेल समस्या अपार तिथे असेल गोरगरीबांचा आमदार बाळाराम पाटील.