*शेतकरी कामगार पक्षाचा रास्ता रोको आंदोलन यशस्वी*
कोण सावळा या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि मोठमोठे पडलेले खड्डे आणि त्यामुळे कंटेनर पलटी होण्याचे प्रमाण आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल यांना जाग आणण्यासाठी आमदार बाळाराम शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली 30 ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या रास्ता रोको आंदोलन घोषित करण्यात आले होते. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोण सावळा रस्त्याचे डागडुजीचे काम हाती घेतले आहे. असे पनवेलचे तालुका पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर साहेब पनवेल आमदार बाळाराम पाटील साहेबांना विनंती केली सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू केले आहे तरी आम्ही विनंती करतो की आपण आंदोलन रद्द करावे अशी विनंती केली तरीसुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन एक अर्ध्या तासाचा प्रतीकात्मक रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आमदार बाळाराम पाटील साहेबांनी घेतला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांच्या समोर येऊन स्पष्टीकरण दिलं की आता आम्ही पाच कोटी चे काम कोण ते नवकार पर्यंतचे मध्ये मध्ये कॉंक्रिटीकरण याचे टप्पे राहिलेले आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत. उर्वरित काम करण्यासाठी पंधरा कोटीची निविदा काढण्याचे तांत्रिक काम आम्ही सुरू केलेला आहे आणि ते वर्षभरात आम्ही पूर्ण करू असे आश्वासन दिल्याने आजचा मोर्चा आंदोलन बंद करण्यात आला. परंतु यावेळी आमदार बाळाराम पाटलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या कि सुरू झालेल्या डागडुजीचे काम थांबलं नाही पाहिजे जर मध्येच थांबलं तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा सूचनावजा इशारा दिला. यावेळी पनवेल पंचायत समितीचे सदस्य जगदीश पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की हा रस्ता लवकर दुरुस्त नाही झाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय मध्ये जाऊन धरणे आंदोलन केले जाईल असे मत व्यक्त केले यावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता प्रीतम शेठ म्हात्रे , रायगड जिल्हा परिषद सदस्य राजू शेठ गणा पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, माजी सभापती गजानन माळी, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, कोण ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अशोक म्हात्रे, आणि इतर कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित होते. या आंदोलनामध्ये कोण येथील *इंडियाबुल्स संकुलातील* महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.