दिनांक :- ८/५/२०२०
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजार आवार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रतिबंध
करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनां करिता दिनांक ११/५/२०२० ते १७/५/२०२० या
कालावधीत बंद राहतील
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या समिती सभागृहात दिनांक ८/५/२०२० रोजी मा.श्री.अनूपकुमार,
प्रधान सचिव (पषन), महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री.संजीव जयस्वाल, विशेष नियंत्रण कक्ष प्रमुख,
महाराष्ट्र राज्य, मावाडी कामगार नेते मा. श्री.नरेंद्र पाटील, मा.श्री.शिवाजी दौंड, विभागीय आयुक्त, कोंकष
विभाग, मा.श्री.राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे, मा.श्री.अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई
महानगरपालिका, मा.श्री.अशोक वाळूज, संचालक, कांदा बटाटा मार्केट, मा.श्री.शंकर पिंगळे, संचालक,
भाजीपाला बाजार आवार, मा.श्री.निलेश वीरा, संचालक, धान्य बाजार आवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई कृषि
उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजार आवारात कोवीड-१९ चे रुग्ण वाढत असल्याने हा संसर्ग टाळण्यासाठी
करावयाच्या उपाययोजना बाबत बैठक घेण्यात आली.
___ सदर बैठकीमध्ये मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारामध्ये कोरोना विषाणूचा वाढणारा
प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर करावयाच्या उपाययोजनां बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई कृषि उत्पन्न
बाजार समितीच्या पाच बाजारपेठांचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेता त्याचे संपूर्ण निर्जतूकीकरण आय.सी.एम.आर.
यांनी विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार करणे व बाजार आवारातील सर्व घटकांची आरोग्य विषयक तपासपी
करून घेण्याकरिता लागणारा कालावधी विचारात घेऊन मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सर्व बाजार आवार
दिनांक ११/५/२०२० ते १७/५/२०२० या एक आठवडयाकरिता बंद ठेवण्याचा निर्षय सर्वानुमते घेण्यात
घेण्यात आला.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजार आवारातील सर्व इमारती व परिसर, गाळे, कार्यालये,
प्रसाधनगृहे, रस्ते, गाळयासमोरील परिसर इत्यादींचे निर्जंतुकीकरण हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने
करण्यात येणार आहे व यासाठी आय.सी.एम.आर. यांनी विहीत केलेल्या कार्यपध्दती चा अवलंब करण्यात येणार
आहे.
बाजार आवारातील माधाडी कामगार, सुरक्षा कामगार, स्वच्छता कर्मचारी व बाजार समितीचे कर्मचारी
तसेच एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे पोलीस विभागाचे कर्मचारी यांची प्राथमिक आरोग्य तपासणी ही
नवी मुंबई महानगरपालिके मार्फत करण्यात येणार असून, प्राश्चमिक तपासणीत संशयित बाजार घटकाची कोवीड
चाचणी ही सवलतीच्या दराने करण्यात येणार आहे व याचा संपूर्ण खर्च बाजार समिती मार्फत करण्यात येईल व
व्यापा-यांनाही या चाचपीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल मात्र चाचणी फी संबंधित व्यापा-यांना स्वतः भरणा
करावी लागणार आहे.
सर्व बाजार आवारामध्ये सॅनिटायजेशन, कर्मचारी आरोग्य तपासणी व इतर अनुषंगिक सूचनांचे नियोजन व
तपासपीचे काम करण्यासाठी सहकार व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिका-याची ‘समन्वयक व संनियंत्रक
अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती व नवी मुंबई महानगरपालिका यांनी वरील नमूद केलेल्या सर्व
उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्त, मा.श्री.शिवाजीराव दौंड हे वेळोवेळी घेतील.
मा. प्रधान सचिव यांनी येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजे रविवारी सुध्दा बाजार आवार सुरु ठेऊन मुंबई शहर
व उपनगरात १० दिवस पुरेल इतका पुरेसा जीवनावश्यक वस्तुंचा साठा पुरविल्या जाईल याची संबंधितांनी दक्षता
घेण्याबाबत निर्देश दिले, जेणेकरून बाजार आवार बंद असतांना मुंबई शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
भासू नये, भाव वाढ होऊ नये व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सुचना केली.
(अनिल चव्हाण)
प्रशासक व सचिव,
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजार आवार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनां करिता दिनांक ११/५/२०२० ते १७/५/२०२० या कालावधीत बंद राहतील