पनवेल,शेकापचा आवाज : मानव ईर्ष्या लोभ मत्सर या विकाराने त्रस्त असून अहंकार जेष्ठत्वाची आघोरी स्पर्धा जगाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. यातून मुक्त व्हायचे असेल तर जगाने बुध्द व्हावे, शुध्द व्हावे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तथा भिमसंग्रामचे संपादक मुकेश शिंदे यांनी बुध्द जंयतीच्या शुभेच्छा देताना केले.
करोना सारखे संसर्गजन्य आजार मानवी शांततामय जीवनाला मिळालेले आव्हान असल्याचे सांगून यु्ध्द किंवा बुध्द या पर्याया पैकी बुध्द जगाने आत्मसात करावा असे म्हणाले. मानवता सेवाभाव जगकल्याण ही शांतीदूत भगवान बुध्दांची ओळख असून मन आणि बुध्दी यांच्या शुध्दतेतून मनुष्य खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडला जाईल. भारत जगात बुध्दांचा देश म्हणून ओळखला जातो तेव्हा आपली जबाबदारी मोठी आसून बुध्द धम्म सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहान शेकापचाआवाज वृतपत्रा द्वारे मुकेश शिंदे ह्यांनी यावेळी केले.
जगाने बुध्द व्हावे, शुध्द व्हावे ! भगवान बुद्धांची करुणा हीच कोरोनावर मात करेल – मुकेश शिंदे !