पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी, व्यवसायिकांनी व सोसायट्यांना Panvel NULM Mobile App मध्ये नोंदणीचे जाहीर आवाहन:- आयुक्त गणेश देशमुख

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी, व्यवसायिकांनी  व सोसायट्यांना Panvel NULM Mobile App मध्ये नोंदणीचे जाहीर आवाहन:- आयुक्त गणेश देशमुख" alt="" aria-hidden="true" />"*


डाऊनलोड करा 
https://play.google.com/store/apps/details?id=com.panvelmahanagarpalika                                                                                                       पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील :
👉 उद्योजक
👉 नागरिक
👉 सामाजिक संस्था
👉 बचत गट
👉 हाउसिंग सोसायटी
👉 गृहिणी
👉 विद्यार्थी यांनी खालील मोबाईल अँप डॉनलोड करावा आणि सर्व सुविधांचे फायदे घ्यावे.


🔊 📲 Download Panvel NULM CLC mobile app  🌇♟


पनवेल महानगरपालिका - दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना ( DAY-NULM) अंतर्गत शहर उपजीविका केंद्राचे (City Livelihood Centre) वेबसाईट व मोबाईल अॅप्लिकेशन सुरू झाले आहे.


💡संकल्पना व मार्गदर्शन💡
मा. श्री गणेश देशमुख,आयुक्त - पनवेल महानगरपालिका


👉मोबाईल अँपचा वापर आणि फायदे:
१. उद्योजक व व्यवसायिक मोफत नोंदणी: या मोबाईल अँप मध्ये तुमच्या व्यवसायाची मोफत नोंदणी करून वस्तू व सेवा ची प्रसिद्धी करून आर्थिक उन्नती करावी.


२. कामगार पाहिजे: उद्योजकांना ऑफिसमध्ये लागणार मनुष्यबळाची माहिती नोकरी या स्थळावर पोस्ट करावी, तुम्हाला योग्य उमेदवार सरळ अँलाय / संपर्क करेल.


२.१ बेरोजगारांना नोकरी मिळवण्याची संधी: सर्व बेरोजगारांनी मोबाईल अँप डाउनलोड करून नोकरी आयकॉन वर क्लीक करून योग्य जॉबसाठी अँप्लाय करावे आणि निर्माण केलेल्या सुविधेचा उपभोग घ्यावा.


३. मोफत खरेदी विक्री करा : सर्व नोंदणीकृत सभासद स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात व प्रॉडक्ट्स अँप च्या माध्यमातून खरेदी विक्री करू शकतो.


३.१ कृषीमित्र : येथे शेतीला पूरक व्यवसाय व माहिती पोस्ट करावी व शेतमाल थेट ग्राहकांना विकण्यासाठी उपलब्ध करून आर्थिक उन्नती करावी


४. वस्तूवर सूट द्या व सेल करा: तुमच्या प्रॉडक्ट्स व सर्व्हिसेस वर सूट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करा व तुमच्या सर्व्हिसेसचा अनुभव ग्राहकांना द्या.


५. कार्यक्रम : तुम्ही कोणतेही कार्यकम मोफत पोस्ट करू शकता, जसे की सेल असेल किंवा बचतगट मेळावा असेल, नोकरी मेळावा, उद्योजक मेळावा, शाळा व कॉलेज फेस्ट, इतर सामाजिक व लोकउपयोगी कार्यक्रमअसे इत्यादी


६. बचतगट नोंदणी: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बचतगटांनी सदर ग्रुप वर नोंदणी करून गटाने बनविलेले वस्तू थेट ग्राहकांना विकण्यासाठी उपलब्ध करून द्या आणि आर्थिक उन्नती करावी.


७. कॉलेजे विद्यार्थी: सदर मोबाईल अँप सर्व कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून उपलब्ध सुविधाचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घ्यावा व उद्योजकतेकडेे वळावे.


८. समाज उपयोगी व्हिडीओ पाहावे: मोबाईल अँप मध्ये समाज उपयोगी व मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते पाहावे व इतरांना पण त्याचा फायदा कसा होईल पाहावे.


९.सरकारी कार्यालय व आपत्कालीन विभागाला थेट संपर्क करू शकता


१०. बातम्या वाचा: सर्व मराठी वृत्तपत्रे अँप डाउनलोड करून वाचू शकता


११. विचारा प्रश्न?: पनवेल क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या मनातील प्रश्न येथे विचारू शकता व इतर मेंबर उत्तरे किंवा मदत करू शकता.


खालील लिंकवर क्लिक करून मोबाईल अँप डाउनलोड करावे व इतरांना माहिती द्यावी:👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.panvelmahanagarpalika


वेबसाईट : www.panvelnulmclc.com


विशेष सूचना:
मोबाईल अॅप संदर्भात काही सूचना किंवा अडचणी असतील तर मेल करावे:panvelnulmclc@gmail.com or for more information call - 9372154533


चला मग!  मोबाईल अॅप डाउनलोड करून एकमेकांना सहाय्य व व्यवसायवृद्धी करून आर्थिक प्रगती करूया.


आपला,
जमीर लेंगरेकर  
उपायुक्त (मुख्यालय)
पनवेल महानगरपालिका