खारघर सेकटर15घरकुल येथे राहतो. मी अपनांस हे सागचा पर्यतन करतो की सर्व सामाजिक संस्था. विविध पक्ष आप अपल्या परीने विविद गटात अनेक प्रकारच्या मदती करत आहेत. त्याबदल त्याचे आभार🙏
परतु समाजा मध्ये असापन एक घटक आहे. तो म्हनजे अपंग घटक अशा संकट काळात त्याना मदतीची खुप गरज असते. परंतु अशा लोकाचा विचार कोनी करताना दीसत नाही. जो कोनि दानी येतो आणि रोडवरील भिकारी किवा अपल्याच वळखिच्या लोकात काय तो वाटपाचा कार्यक्रम करतात फोटो काढतात आणि सोशयल मिडियावर पाठवतात आणि नाव चमकवतात ठीक आहे तुम्ही करता तो तुम्हचा अदीकार आहे.
पन दादा हेच कार्य जर खरच ज्या लोकाना गरज आहे उदा.अम्हच्या सारखे अपंग त्याना खरच गरज आहे. कारन अता कालचीच गोष्ट आहे खारघर मध्ये जो कोणी येतो आणि पुलाखालील जो भिकारी वर्ग आहे तिथे वाटतात फोटो विडीओ बनवतात आणि निघुन जातात. ते गेल्या नंतर हेच भिकारी त्या सर्व अनाची नासाडी करतात. ते तरी काय करतील कारण प्रत्येक जन येतो. आणि त्याना नविचारता पाकीट देतोय अन्न ची तेतरी काय करना.
म्हनुन माजि अशी विनंती आहे की ज्याना खरोखर गरज आहे त्याच्यासाठी काय तरी करा धुवा आशिर्वाद मिळतील. ते अपंग लोक तर काय रोडवर येऊ शकत नाही आपल्याला त्याच्यापर्यत जावालागेल तर माझी येवडीच विनंती आहे. दादा काय चुकले असेल तर मनापासुन शमाकरावि
🙏अपला एक अपंग बांधव🙏
अपंगांची व्यथा