*स्पॕगेटी हौसिंग सोसायटीच्या बांधकामाला तडे*
खारघर, सेक्टर-१५ स्थित स्पॕगेटी हौसिंग काँम्प्लेक्सच्या बांधकामाला तडे गेल्याचे निदर्शनास आले असून काल पहाटे जे.के,एल.एम.(स्पॕगेटी हौ,सो.)तील एका इमारतीमधील एका सदनिकेच्या बाहेरील सज्जाचा काही भाग कोसळला.त्याचबरोबर काही पिलर आणि भिंतींना तडे गेल्याचे सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव अनुक्रमे शिवाजी पाटील वयशवंत देशपांडे यांनी *जनसभा* च्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिले.
सिडकोने लार्सन अँन्ड टूब्रो या कंपनीकडून २००४ मधे या काँम्प्लेक्सची निर्मिती केली आहे.नवमध्यम वर्ग या काँम्प्लेक्सकडे बांधकामाचा चांगला दर्जा आहे असे समजून आकर्षित होत असतो.
आता तरी सिडको या काँम्प्लेक्सकडे लक्ष देणार का?असा प्रश्न रहिवाशी विचारीत आहेत.